अजित अनंतराव पवार ( 66 वर्षे) जन्म – 22 July 1959 मृत्यू – 28 January 2026
[ उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य]
28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अजित दादा बारामतीकडे येणार होते, परंतु विमान खाली उतरत असताना विमानाला अपघात झाला व त्यामध्ये असणाऱ्या अजितदादासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
1982 ते 2026 ( दादांचा राजकीय प्रवास)


1982 मध्ये सर्वप्रथम सहकार क्षेत्रातून दादांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर पहिल्यांदा ते निवडून गेले.

1991 मध्ये दादा पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले ,परंतु मा. शरदचंद्र पवार यांच्यासाठी जागा मोकळी करून देण्याच्या निर्णयातून त्यांनी काही दिवसातच खासदार पदाचा राजीनामा दिला.
या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 1991 च्या पोट निवडणुकीत अजित दादा पहिल्यांदा बारामती मधून आमदार म्हणून निवडून आले. त्याचबरोबर 1995 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले.

1999 ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत दादा सिंचन मंत्री म्हणून काम पाहत होते.
डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 ग्राम विकास मंत्री, तर जेव्हा 2004 मध्ये ते पुन्हा निवडून आले तेव्हा त्यांनी जलसंपदा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित दादांना राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले तसेच त्यांनी अर्थ ,सिंचन ,ऊर्जा ही खाती सांभाळली.

2010 मध्ये अजित पवार जेव्हा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली व सिंचन आणि वित्तीय नियोजनावर भर दिला.

2019(पहाटेचा शपथविधी) 23 नोव्हेंबर 2019 भाजप नेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ,मात्र हे सरकार अवघे 80 तासच टिकले.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट-02 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली, आणि समर्थक आमदारासह त्यांनी मा. एकनाथ शिंदे व मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा दिला, आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

निवडणूक आयोगाचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ) हे चिन्ह अजित पवार यांच्या गटालाच बहाल केले.

28 जानेवारी 2026 बारामती जवळ गोजुबावी गावात एका चार्टर्ड विमान अपघातात मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला.



Leave a Reply