अभ्यासनीती

यशाची रीत सोपी, देईल साथ अभ्यासनीती !

राज्यघटना म्हणजे काय?

मानवी जीवनात नियम नसतील तर कुठलीही समाज व्यवस्था नीट काम करणार नाही. कारण नियमच समाजाला एकत्र ठेवण्याचे. काम करत असतात. माणसांनी माणसांशी कस वागाव काय कराव काय करू नये यासाठीचे नियम अगदी प्राचीन काळापासून आखून दिले गेले आहेत.व आजही तीच प्रक्रिया बदल करून पुढे चालू आहे. या नियमांनाच आधुनिक युगात कायदा अस म्हणतात. आणि कायदा हा लोकांना विचारात घेऊन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चालवता जातो. जिथे चालवला जातो त्याला ‘संसद‘ असे म्हणतात.

आपल्या नावाने संसदेत काय चालते हे लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे माहीत असणे खूप महत्वाचे असते. हे सामान्य जनतेला व लोकशाहीला जीवंत ठेवण्यासाठी आवश्यक असते. आपले जीवन, आपले स्वातंत्र्य, आपले कुटुंब, आपली एकता यांना न्याय देणाऱ्या यंत्रणेची आपल्याला माहीती असावी लागते ही माहीती आपल्याला कायद्याने/ नियमांनी कळते.

थोडक्यात सांगायच तर राज्यघटना म्हणजे असं एक पुस्तक/ ग्रंथ ज्यामध्ये नागरिकांनी शासनाप्रती व शासनाने नागरिकांप्रती कसे वागावे यासंबंधीची नियमावली/ मूळ कायदा म्हणजे राज्यघटना होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *